मुंबई : मुंबई विमानतळावर एका विचित्र अपघातात एका एअर इंडिया कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून हैदराबादला जाणा-या विमानाच्या इंजिनच्या पंख्यात हा कर्मचारी ओढला गेला आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.
सुब्रमण्यम असं या ग्राऊंड स्टाफचं नाव असल्याचं समजतंय. मात्र त्याचा मृतदेह ओळखण्यापलीकडे कापला गेलाय. रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.