सलमानच्या घरासमोर तमिळ संघटनांची निदर्शनं

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर तमिळ संघटनांनी निदर्शनं केली आहेत, सलमान खानने श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केला होता.

Updated: Jan 4, 2015, 12:16 PM IST
सलमानच्या घरासमोर तमिळ संघटनांची निदर्शनं title=

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरासमोर तमिळ संघटनांनी निदर्शनं केली आहेत, सलमान खानने श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केला होता.

या विरोधात या संघटनांनी सलमान खानच्या घरासमोर निदर्शनं केली आहेत. महेंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केल्याने या संघटना संतापल्या आहेत.

कोलंबोत सलमान खानने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह महेंद्रा राजपक्षे याचा प्रचार केला होता. श्रीलंकेतील सत्ताधारी पक्ष आणि सलमान खानच्या बिईंग ह्युमन फाऊंडेशनने श्रीलंकेत डोळे तपासणीचं शिबिरही आयोजित केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.