‘पेशावर’नंतर मुंबईतल्या शाळा ‘टार्गेट’वर!

पेशावरमध्ये सैनिकी शाळेवर केलेल्या क्रूर आणि निंदनीय हल्ल्यानंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर मुंबईतल्या शाळा होत्या, असा खुलासा नुकताच करण्यात आलाय. 

Updated: Dec 24, 2014, 12:24 PM IST
‘पेशावर’नंतर मुंबईतल्या शाळा ‘टार्गेट’वर! title=

मुंबई : पेशावरमध्ये सैनिकी शाळेवर केलेल्या क्रूर आणि निंदनीय हल्ल्यानंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर मुंबईतल्या शाळा होत्या, असा खुलासा नुकताच करण्यात आलाय. 

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीस अन्सारीच्या चौकशीत ही बाब उघड झालीय. पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईतही होणार होता... यावेळी, मुंबईतल्या प्रतिष्ठित शाळांवर हल्ला करण्याचा कट रचला जात होता... गेल्या दोन महिन्यांपासून यासाठी तयारी केली जात होती, अशी धक्कादायक कबुली अन्सारीनं दिलीय. अनीस अन्सारी याला ऑक्टोबरमध्ये एटीएसनं अटक केली होती.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका सैनिकी शाळेवर दहशतवाद्यांनी अमानवीय पद्धतीनं लहान-लहान चिमुरड्यांवर गोळीबार केला होता.  त्यामुळे, या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह  १४८ जण बळी पडले होते... या हल्ल्याची भारतासह जगभरात निंद करण्यात आली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.