सुट्टीनंतर आज बँकांचे व्यवहार सुरु

गुरुनानाक जयंतीच्या सुटीनंतर आज बँका सुरू होत आहेत. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आज पासून बँकेत चार रांगा करण्यात येणार आहेत. 

Updated: Nov 15, 2016, 08:43 AM IST
सुट्टीनंतर आज बँकांचे व्यवहार सुरु title=

मुंबई : गुरुनानाक जयंतीच्या सुटीनंतर आज बँका सुरू होत आहेत. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आज पासून बँकेत चार रांगा करण्यात येणार आहेत. 

यात वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी रांग असेल. याशिवाय पैसे अदला बदली करणे, पैसे खात्यात जमा करणे आणि पैसे खात्यातून काढणे यासाठीही वेगवेगळ्या रांगा करण्यात येतील. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचेल. त्याचप्रमाणे आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार आहे. 

याशिवाय पाचशे रुपयांच्या जवळपास 50 लाख नोटा देशभरात वितरीत करण्यात आल्या आहेत. त्या देखील आज पासून बँकांमध्ये आणि काही एटीएमद्वारे मिळू शकतील. या उपाययोजनांमुळे ग्राहकांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होईल अशी शक्यता आहे