'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'

 झी २४ तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात देऊ केला आहे. यासाठी झी २४ तासने प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे. 

Updated: Sep 22, 2015, 06:24 PM IST
'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ'  title=

मुंबई :  झी २४ तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात देऊ केला आहे. यासाठी झी २४ तासने प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे. 

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' या उपक्रमात अंतर्गत महाराष्ट्रातील २१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेला भाग पडावे लागले आहे. 

तुमची साथ मिळाली तर यांना जगण्याची नवी उभारी मिळेल आणि पुन्हा काळ्या आईवर हिरवा शालू पसरविण्यात यशस्वी होतील. 

पावसाच्या ढगांनी फिरवली पाठ...

दुष्काळाचे ढग मात्र आलेत दाटून...

अन्नदात्या शेतक-याचं दु:ख

आपणही थोडं घेऊ या का वाटून..?

दुष्काळात होरपळणा-या शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी

झी 24 तासचं खास अभियान

दुष्काळावर मात...कुटुंबांना साथ...

तुम्ही सहभागी होऊ शकता या अभियानात

शेतक-यांसाठी आर्थिक मदतीचा हात देऊन...

चला आपणही थोडं, शेतक-यांचं दु:ख घेऊया वाटून वाटून...

मदतीसाठी आमचा पत्ता

झी 24 तास, बी विंग, चौथा मजला, मधू इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई -400013

दूरध्वनी क्रमांक - 022-24827821

खालील या शेतकऱ्यांची थोडक्यात माहिती दिली आहे. त्यांना तुम्ही मदत पाठवू शकतात. 

1.    नारायण मुंढे : जालना मुंढे अपंग असून त्यांची दोन मुले सुध्दा अपंग आहेत, त्यांची बायको जनाबाई मुंढे त्यांचा सांभाळ करतात, शेतमजूरी करून घर चालवितात परंतु दुष्काळामुळे काम सुध्दा मिळत नाही. 
2.    पंचफुला घाडगे: बीड आजारपणात नवरा गेला, पदरी चार मुली त्यांची लग्न झालीत, एक मुलगा, गरीबी असताना मुलाला वोल्व्ह चा आजार, धुणी भांडी आणि शेतमजूरी करून घर चालवतात, परंतु दुष्काळामुळे रोजगार मिळेना, उपचारासाठी दोन ते अडीच लाखांचा खर्च.

3.    गंगुबाई दांडगे:- औरंगाबाद कर्त्या पुरूषाने २०१२ साली आत्महत्या केल्याने दु:खाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला, त्यांच्यावर वृध्द सासू सासरे आणि तीन मुलं यांची जबाबदारी आहे, १ एकर कोरडवाहू शेतीत दुष्काळात काहीच पिकले नाही.
4.    नारायणराव कुबरे: औरंगाबाद पैशाच्या अभावामुळे कुबरेंच्या पत्नींना उपचार मिळाले नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला, ती सल कायम असताना आता दुष्काळामुळे पोटापाण्याचा प्रश्न बिकत झाला आहे, ७ वर्षाच्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आहे 
5.    यशोदा पालवे :- औरंगाबाद  यशोदा पालवे यांच्या सास-यांनी आत्महत्या केली आणि सततच्या चिंतेने आजारी पडून पतीने जीव गमावला, घरात आजी सासू, सासू आणि त्यांच्या दोन मुली राहतात, दुष्काळाने त्यांच्यावरचं छत्रंच गमावलं, घरात एकही पुरूष नाही, या परिस्थितीमुळे दोन मुलींना अनाथआश्रमात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली.
6.    प्रल्हाद इघारे: हिंगोली त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू जमी आहे, तीन वर्षापासून नापीकी, दुपटीने व्याजाने पैसे काढून  त्यांनी सोयाबीन पेरेलं, पेरणी झाल्यापासून पाऊस आलाच नाही, शेतात काही पिकत नसल्याने पुढचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे, मोठा मुलगा थोडा गतिमंद, लहान मुलाचा अपघाती मृत्यू आणि सहा जणांची जबाबदाई त्यांच्यावर आहे.

7.    सुमित्रा बडे:- जालना यांच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झाले, मुले १० आणि १२ वीला बोर्डाला, ३ एकर कोरडवाहू जमीन दुष्काळामुळे पीकच नाही, परिणामी शेतमजूरी करावी लागते ती ही वेळेवर मिळते असे नाही.
8.    गयाबाई पंडित:- जालना वय वर्ष ७५ दोन मुलांपैकी एकही मुलगा सांभाळायला तयार नाही, दोन एकर जमीन मालकीण, जमीन मुलं कसतात तिसरा हिस्सा आईला देतात मग ते कितीही असो, घर सुध्दा नातलगांनी दया दाखवून दिलेले. औषध आणि इतर खर्च महिन्याला ५ हजाराची गरज.

9.    संतराम माने:- लातुर दुष्काळामुळे काम नाही, काम नसल्यामुळे माने यांच्यावर भीक मागून खाण्याची वेळ आली. चार मुले आणि दोघे असा प्रपंच शेतात काम नाही म्हणून गावोगावी जाऊन टिकल्या, फण्या विकून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला परंतु तेही चालले नाही.
10.    कालुसिंह बयास:- दुष्काळामुळे हुशार मुलांच्या अभ्यासावर आणि भविष्यावर परिणाम, बयास यांच्या मुलाला १०वीत ८०% गुण होते, फीस साठी ८ हजार रूपये नसल्याने नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला नाही, शेतीसाठी आणि शिक्षणासाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे, दुष्काळामुळे पीकही नाही कामही नाही.
11.    सरस्वती कदम:- कर्ज, नापीकी आणि जमिनीच्या वादातून त्यांचे पती केशव कदम यांनी आत्महत्या केली, मागे बायको सरस्वती कदम ३ मुले वृध्द सासू सासरे आहेत. दुष्काळामुळे कामही मिळत नाही सरस्वती ताई संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करतात.
12.    उत्तम पवार:- ७ जणांच कुटुंब,  १ एकर  ८ गुंठे जमीन, दुष्काळामुळे काही उगवलेच नाही  परिणामी मजूरी करावी लागली परंतु दुष्काळामुळे कामही मिळत नाही, मातीने सारवलेल्या पत्र्याच्या घरात राहतात.
13.    बालिका येदले:- ६० वर्षीय बालिका येदले पडक्या घरात राहतात, घराला दरवाजा सुध्दा नाही, पती वारले, एकुलता एक मुलगा रेणापुरला खाजगी संस्थेत काम करून आपल्या तुटपुंज्या पगारात पत्नी आणि मुलाचा सांभाळ करतो, मदत नाही मिळाली तर मागून खाऊ अशी अवस्था. 
14.  सुधाकर रायमाले -  सुधाकरराव अर्धांगवायुमुळे जागचे हालुही शकत नाहीत... आता घरी पती पत्नी आणि दोन मुले आहेत...मोठी मुलगी ईयत्ता 10 वीत शिकतेय तर मुलगा 7 वी वर्गात आहे... या सर्वांना जगवण्याची जबाबदारी चंद्रभागा यांच्यावर येऊन ठेपलीये... गावात एक मंदीर आहे...या मंदिरात अधूनमधून पंगती दिल्या जातात...त्या ठिकाणी पंगत असली की यांना पोटभर जेवायला मिळतं... चंद्रभागाबाई शेतात मजुरी करतात... पण दुष्काळ परिस्थीतीमुळे इतरही शेतात काम भेटत नाहीये. 

15.    रमेश शिंदे – बीडच्या हा शेतकरी अडीच एकर जमिन आणि पत्र्याच्या घरावर पाच मुलांच्या संसाराचा गाडा हाकतोय. गेली ३ वर्षे दुष्काळ पडल्याने शेतीचे उत्पन्न नाही – शेतमजुरीची कामेही नाही. दोन मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पुढे उभा आहे. 

16.    अण्णाराव जाधव – लातुरच्या या शेतक-यांची साडेतीन एकर जमीन मात्र दुष्काळामुळे उत्पन्न नाही. मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्न ऐरणीवर , पुण्यात इंजिनियरिंगचे शिक्षण घेणा-या मुलाचे शिक्षण फिमुळे मध्येच थांबण्याची भिती, जमिन असतानाही शेतमजुरी करण्याची वेळ मात्र काम मिळत नाही. 

17.    पपिताबाई शिंदे – उस्मानाबादच्या ही महिला शेतकरी – वयाच्या २५ व्या वर्षी वैधव्य – पती पाण्यात बु़डून मृत्यू – सोयाबीन पिक दुष्काळामुळे आले नाही – एकुलता एक मुलालाही जगवणे कठिण – खाण्याबरोबरच मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर 

18.    माणिक शिंदे परभणी – पाच सदस्य असलेले हे कुंटुबं – गेले ३ वर्ष शेतात नापिकी – एका मुलाला १२ वीत शिक्षण अर्धवट सो़डण्याची वेळ आली आहे. मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्जही डोक्यावर आहे. 
 

 

19.    चतुर्भुज जाधव लातुर – ३ एकर जमिन असून शेतमजूरी करण्याची वेळ – शिक्षणाची फि परवजत नसल्याने मुलांना शिक्षण अर्धवट सोडून किराणा दुकानात काम कऱण्याची वेळ. बिगारी कामेही मिळत नसल्याने उपाशी राहाण्य़ाची वेळ आली आहे.

20.    कल्पना कदम या बीडच्य महिला शेतकरी – वयाच्या २६ व्या वर्षी वैधव्य – पतीच्या आजारपणात पैसे नसल्याने उपचार झाले नाहीत त्यामुळे निधन – दोन मुलांसह जगण्यासाठी धडपड सुरु आहे. एक एकर जमीन मात्र दुष्काळामुळे काहीच पिकले नाही – वृद्ध सासुबाईंनाही जगवण्याची धडपड कल्पनाबाई करतात. 

21.    सुनंदाताई मुळे  उस्मानाबाद  – महिला शेतकरी – ९ वर्षांपुर्वी पतीचे निधन – ३ मुले – एका मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज दुश्काळामुळे फेडू शकत नाही – जमिनीच्या एका तुकड्यावर पिक नाही – जगायचे कसे मुलांना शिक्षण कसे द्यायचे हा देखील प्रश्न 

चेक या नावाने पाठवावे




Sr.No Farmers Name District
1 Santram Mane   Latur
2 Saraswati Kadam  Nanded
3 Panchafula ghadage  Beed
4 Narayan Kubare  Aurangabad
5 Uttam Pawar  Nanded
6 Gayabai Pandit Jalna
7 Narayn Mundhe  Jalna
8 Pralhad Ighare  Hingoli
9 Balika Yedale  Latur
10 Yashoda Palave   Aurangabad
11 Sumitra Bade  Jalna
12 Kalusing Bayas  Nanded
13 Gangubai Dandage  Aurangabad
14 Ramesh Shinde  Beed
15 Annarao Jadhav  Latur
16 Sudhakar Raimale  Nanded
17 Papitabai Shinde  Osmanabad
18 Manik Shinde  Parabhani
19 Chaturbhuj Jadhav Latur
20 Kalpana Kadam  Beed
21 Sunandatai Mule   Osmanabad

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.