हार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले!

पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.  

Updated: Mar 18, 2016, 01:23 PM IST
हार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले! title=

मुंबई : पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.  

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलीत लोकल धावण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र गुरुवारी अचानक ही ट्रेन हार्बरवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिलीय.

यामुळे, हार्बर रेल्वेनं प्रवास करणारे प्रवाशांना मात्र चांगलाच आनंद झालाय. पण, पश्चिम रेल्वेचे प्रवासी मात्र हिरमुसले आहेत. ऑक्टोबर पासून या मार्गावर एसी रेल्वे सुरू होणार असल्याचं समजतंय. 

हार्बर रेल्वेमार्गावर धावण्यात येणारी ही रेल्वे 'भेल'कडून चेन्नईतल्या 'आयसीएफ' कारखान्यात तयार होतेय. पण, हार्बर की ट्रान्स हार्बर म्हणजेच ठाणे-पनवेल या मार्गावर ही एसी ट्रेन धावणार याबद्दल प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.