'अन्याय आहे, न्याय मिळेल', अटकेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असले तरी आपल्यावर अन्याय झाल्याचं अजूनही त्यांना वाटतंय. 

Updated: Mar 18, 2016, 08:22 AM IST
'अन्याय आहे, न्याय मिळेल', अटकेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असले तरी आपल्यावर अन्याय झाल्याचं अजूनही त्यांना वाटतंय. 

गुरुवारी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना ईडी न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर, छगन भुजबळ यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

यावेळी, भुजबळांना पोलीस आर्थर तुरुंगात नेत असताना पत्रकारांनी भुजबळांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, 'आपल्यावर अन्याय झालाय... न्याय मिळणार' अशी आशा भुजबळांनी व्यक्त केलीय.  

कैदी नंबर ४५२९

छगन भुजबळांना आर्थर रोड कारागृहात कच्चा कैदी नंबर ४५२९ असा देण्यात आलाय. भुजबळांसोबत त्यांच्या बराकीत ४ ते ५ कैदी आहेत. 

समीर भुजबळही आर्थर रोड तुरुंगात

समीर भुजबळही सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यामुळं काका आणि पुतण्या एकाच जेलमध्ये मुक्काम असणार आहे. समीर भुजबळ आणि छगन भुजबळ वेगवेगळ्या बराकीत आहेत. तत्पूर्वी समीर आणि छगन भुजबळ यांची तब्बल चार तास समोरासमोर चौकशी करण्यात आली.