गर्भश्रीमंत मुंबईत वाढतेय `गर्भपातां`ची संख्या!

मायानगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी... गर्भश्रीमंतांचं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे या शहरात गेल्या तीन वर्षात वैद्यकीय गर्भपाताचं प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढल्याचं उघड झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 16, 2013, 01:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायानगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी... गर्भश्रीमंतांचं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे या शहरात गेल्या तीन वर्षात वैद्यकीय गर्भपाताचं प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढल्याचं उघड झालंय.
मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या पाहणीत ही बाब उघड झालीय. राज्यातील अवैध गर्भपाताबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने ही माहिती दिलीय. २०१०-२०११ या वर्षात १६,९७७ गर्भपात, २०११-२०१२ या वर्षात १७,३०९ गर्भपात तर २०१२-२०१३ या वर्षात २७,२५६ गर्भपात करण्यात आले.
माहितीच्या अधिकारात उघड झालेल्या नोंदींनुसार शहरात भांडुपमध्ये (२,६०३) सर्वाधिक वैद्यकीय गर्भपात नोंदविण्यात आले असून त्यापाठोपाठ चेंबूर (२,५०९) आणि अंधेरी (२,४८९) या भागांचा क्रमांक लागतो.

मात्र, या वाढत्या गर्भपातांचा संबंध भ्रूणहत्येशी लावणे गैर असून कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे नोंदणीचे प्रमाण वाढल्याने हा फरक जाणवत असल्याचे मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.