‘ई-आधार’ कोलमडला...

`आधार’ कार्डसाठी मुंबईतून नोंदविण्यात आलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांचा डेटा बंगळुरला पाठवताना नष्ट झाला. डेटा असलेली हार्ड डिस्क खराब झाली आहे.

Updated: Apr 24, 2013, 10:28 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘आधार’ कार्डसाठी मुंबईतून नोंदविण्यात आलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांचा डेटा बंगळुरला पाठवताना नष्ट झाला. डेटा असलेली हार्ड डिस्क खराब झाली आहे.
या डेटामध्ये नागरिकांचे पॅन क्रमांक, निवासाचा पुरावा असल्याने या माहितीचा दुरूपयोग होण्याच्या भीतीने मुंबईकर धास्तावले आहेत. दरम्यान, मुंबईतील डेटा हबमध्ये सर्व माहिती उपलब्ध असल्याने आधार क्रमांक देण्यात काहीही अडचण येणार नाही, अशी माहिती आयटी विभागातील सूत्रांनी दिली.

बंगरूळला माहिती पाठवताना हार्ड डिस्क खराब झाल्यामुळे मुंबईतील सुमारे तीन लाख नागरिकांचा डेटा नष्ट झाला. तो नष्ट झाला की केला गेला असा प्रश्न मुंबईकरांनकडून विचारला जातो आहे.