केवळ बीपीएलकार्ड धारकांना ९ सिलिंडर?

नऊ सिलिंडरसाठी सबसिडी केवळ बीपीएल कार्डधारकांनाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला केवळ सहाच सिलिंडरवर सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2012, 08:32 AM IST

www.24taas.com, मुंबई
नऊ सिलिंडरसाठी सबसिडी केवळ बीपीएल कार्डधारकांनाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला केवळ सहाच सिलिंडरवर सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधींनी सर्व काँग्रेसशासित राज्यांमध्ये नऊ सिलिंडर सबसिडीत देण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारनं सरसकट सगळ्यांना नऊ सिलिंडर सबसिडीत दिल्यास सरकारच्या तिजोरीवर २४०० कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे केवळ बीपीएलधारकांनाच म्हणजेच दारिद्रय़ रेषेखालील लोकांनाच सबसिडी देण्याचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आलाय. आता याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
दिल्ली, हरयाणा आणि आसाम या काँग्रेसशासित राज्यांनी ही सवलत यापूर्वीच दिली. त्यामुळे सोनियांचा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धुडकावणार का? असा प्रश्नही उपस्थित झालाय.