www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनिवासी भारतीय महिलेच्या बँक खात्यामधून तब्बल ५० लाख रुपयांची रक्कम काढणाऱ्या तिघा आरोपींना माटुंगा पोलिसांनी अटक केलीय. बनावट चेकच्या आधारे ही रक्कम काढण्यात आली होती. यात बँकेच्या एका कर्मचार्यााचाही समावेश आहे.
मूळच्या चंदिगड इथल्या असलेल्या गोबिंद कौर या अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होत्या. त्यांचं चंदिगड इथल्या आयसीआयसीआय या बँकेत खाते होते. या बँकेतून त्यांनी कित्येक वर्षे रक्कम काढली नव्हती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या खात्यातून ४९ लाख २८ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचं बँकेच्या लक्षात आलं. बँकेनं याबाबत चौकशी केली असता, दादर इथल्या नितीन शिरोडकर आणि संदीप काळे यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं समजलं. त्यानुसार त्यांनी दादरमधील आयसीआयसीआय या बँकेशी संपर्क साधून त्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले.
इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात आल्यानं इथल्या कर्मचार्यांानाही त्यांचा संशय आला. त्यामुळं त्यांनी १ जानेवारीला माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुख्य आरोपी बाळू गटे यानं बनावट कागदपत्रांच्या आधारे संदीप काळे या नावानं धनलक्ष्मी बँकेत खातं उघडलं होतं. त्यानंतर राजेश जामकर याच्याही खात्यामध्ये बनावट चेकच्या आधारे काही रक्कम जमा करून दीड महिन्यात चेक आणि एटीएममधून ही रक्कम या आरोपींनी काढली.
४ जानेवारीला संदीप काळे नेहमीप्रमाणं या बँकेत रक्कम काढण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याचं खरे नाव बाळू गटे असल्याचं निष्पन्न झालं. महेंद्र गुरव या आयसीआसीआय कर्मचार्याीनंच बनावट चेक तयार करून ही रक्कम लांबवण्यास मदत केल्याचं त्यानं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केली. या सर्व आरोपींना कोर्टानं १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.