www.24taas.com, मुंबई
एपीआय सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध होतो आहे. शिवाय मारहाण करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर मारहाण करणाऱ्या 5 आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. शिवाय या 5 आमदारांना पोलीस कारवाईला देखील सामोरं जावं लागणार असल्याची माहिती मिळते आहे.
पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिले होते. त्यामुळं आज या आमदारांवर निलंबन कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी या आमदारांचे निलंबन होण्याची शक्यता....
1. राम कदम - मनसे
2. क्षितीज ठाकूर - बहुजन विकास आघाडी
3. जयकुमार रावल - भाजप
4. प्रदीप जैस्वाल - अपक्ष
5. राजन साळवी - शिवसेना