आर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे.. दहा मृत्यू आणि 659 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या मुंबईत डेग्यूनं हाहाकार माजवला आहे... डेंग्यूशी दोन हात करतांना प्रशासन यंत्रणा अपुरी पडतेय. इबोलाचा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे..

Updated: Nov 6, 2014, 08:53 PM IST
आर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात title=

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे.. दहा मृत्यू आणि 659 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या मुंबईत डेग्यूनं हाहाकार माजवला आहे... डेंग्यूशी दोन हात करतांना प्रशासन यंत्रणा अपुरी पडतेय. इबोलाचा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे..

केईएममध्ये आणखी दोघा डॉक्टरांना डेंग्यू

केईएममध्ये आणखी दोघा डॉक्टर्सना डेंग्यूची लागण झालीय. डॉ. इर्शाद पठाण आणि डॉ. धीरज मयेकर अशी त्या डॉ़क्टर्सची नावं आहेत. हे दोघेही कॉर्डिओलॉजी विभागातले आहेत. केईएममधल्या आतापर्यंत सहा डॉक्टर्सना डेंग्यूची लागण झालीय. त्यापैकी एका निवासी डॉक्टरचा गेल्या आठवड्यात मृत्यू झालाय.

नाशिकमध्ये एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये डेंग्यूमुळं ४२ वर्षीय जितेंद्र कुलकर्णी यांचा मृत्यू झालाय. चेतना नगर परिसरातील रहिवासी असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नीलाही डेंग्यूची लागण झालेली आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्येही १२ वर्षीय श्वेता चासकरचा डेंग्यूमुळं बळी गेलाय. खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.

डेंग्यूचा मुद्दा थेट कोर्टात

डेंग्यूचा मुद्दा आता थेट कोर्टात पोहचलाय़. साफसफाई नीट केली जात नसल्यामुळंच डेंग्यूचा प्रसार होत असल्याचा आरोप नागपूरकरांनी केलाय. या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून महापालिकेच्या आरोग्य अधिका-याला १ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच सुनावणीला हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.