www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विमानतळावर सिमाशुल्क विभागानं कारवाई करत २५ किलो पेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. या सोन्याची किंमत ६ कोटी ५३ लाख ९१ हजार रुपये आहे.
दुबईहून आलेल्या मोहम्मद अबू बकर आणि मोहम्मद असलम या दोन प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाच्या `एअर इंटिलिजन्स युनीट` विभागानं ही कारवाई केलीये. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
या सोने तस्करी मागे दुबईतील मोठे सोने तस्कर असल्याचा संशय सीमाशुल्क विभागाला आहे. त्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जातेये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.