दहशतवाद्यांशी वाटाघाटी करायला विशेष पथक

दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यासाठी विशेष पथक मुंबई पोलिसांनी स्थापन केलंय. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलं पथक असणार आहे. हॉस्टेज निगोशिएशन पथक असं या पथकाचं नामकरण करण्यात आलंय. दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचं काम हे पथक करणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 16, 2012, 09:56 AM IST

www.24taas.com, मुंबई
दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यासाठी विशेष पथक मुंबई पोलिसांनी स्थापन केलंय. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलं पथक असणार आहे. हॉस्टेज निगोशिएशन पथक असं या पथकाचं नामकरण करण्यात आलंय. दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचं काम हे पथक करणार आहे.
या पथकातील अधिकाऱ्यांना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांकडून प्रशिक्षण देण्य़ात आलंय. दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणं शिवाय चर्चेद्वारे शरणागती पत्करतील का याचा अंदाज घेणं अशी काम या पथकाची असतील. मुख्य बाब म्हणजे रक्तपात रोखणे आणि जिवितहानी होणार नाही याची काळजी घेणं या पथकाचं काम असेल.

ओलिस नाट्यात या पथकाची भूमिका महत्वाची असणार आहे.मुंबईचे सहपोलीस आयुक्त रजनिश सेठ यांच्या नेतृत्वाखाली या पथकाची स्थापना करण्यात आलीय. पथकात एकूण १७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.