पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या १९ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे  लोकलवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

Updated: Dec 14, 2016, 11:33 PM IST
पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या title=

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या १९ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे  लोकलवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

पश्चिम रेल्वेमार्गावर १२ डबा लोकल धावत असतानाच काही वर्षांपूर्वी पंधरा डबा लोकलही सुरू करण्यात आल्या. आतापर्यंत पंधरा डबा लोकलच्या दोन लोकल धावत असून, त्यांच्या ३० फेऱ्या सुरु आहेत. १५ डब्यांची लोकल १९ डिसेंबरपासून सुरू केली जाईल आणि तिच्या १२ फेऱ्या होतील. यात चर्चगेट ते विरारबरोबरच अंधेरी ते विरारदरम्यान फेऱ्या होणार आहेत.

अप मार्गावर

विरार ते अंधेरी - ४.१४ वा. - बोरीवली ते अंधेरीपर्यंत जलद 
विरार ते चर्चगेट - ६.३२ वा. - मुंबई सेंट्रल ते चर्चगेट जलद 
विरार ते अंधेरी - ९.३७ वा. - धिमी
विरार ते चर्चगेट - ११.३९ वा. - मुंबई सेंट्रल ते चर्चगेट जलद
विरार ते चर्चगेट - १४.४० वा. - मुंबई सेंट्रल ते चर्चगेट
विरार ते चर्चगेट - १७.५५ वा. - मुंबई सेंट्रल ते चर्चगेट जलद 

डाऊन मार्गावर

अंधेरी ते विरार - ५.३४ वा. - अंधेरी-बोरीवली-भार्इंदर-वसई रोड-विरार जलद 
चर्चगेट ते विरार - ८.०० वा. - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल जलद 
अंधेरी ते विरार - १०.३६ वा. - धिमी
चर्चगेट ते विरार - १३.०३ वा. - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल जलद 
चर्चगेट ते विरार - १६.१३ वा. - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल जलद