www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढल्याचे बुधवारी दुपारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातून समोर आले आहे. ‘पन्नास पेट्या (५० लाख) सांगतो त्या ठिकाणी आणून दे, नाही तर २५ गाड्या लावून उडवून देईन’ अशी धमकी रवी पुजारीनं एका बिल्डरला दिलीय. त्यामुळे, कल्याण-डोंबिवलीमधील बिल्डर लॉबीत एकच खळबळ उडालीय.
कल्याण पूर्वेत तीसगाव येथील श्री पॅलेसमध्ये राहणारे संजय अनंत गायकवाड (४५) यांनी या संदर्भात तशी बुधवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यांच्या मोबाइलवर ५ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान रवी पुजारीचा फोन आला. ‘मी रवी पुजारी बोलतोय, तुझ्या कन्स्ट्रक्शन साईट्स मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. मी तुझा संपूर्ण बायोडाटा काढून ठेवला आहे… पारी अडीच वाजेपर्यंत ५० लाख रुपये काटई नाक्यावरील हॉटेलमध्ये पाठव नाहीतर २५ गाड्या बंगल्यासमोर लावून तुला उडवून टाकीन लावून उडवून टाकीन’ अशी धमकी दिल्यामुळे गायकवाडांना पहिल्यांदा धक्काच बसला. त्यांनी तब्बल १३ दिवस थांबून बुधवारी तशी तक्रार दाखल केली.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. धमकीसाठी वापरण्यात आलेला मोबाइल नंबर स्थानिक असल्याचं समजतंय. हा क्रमांक ‘एसएसजीजी’ मुंबई मेट्रो लूप टेलीकॉम असा रजिस्टर्ड दाखवत असल्याचे ट्रू कॉलरवरून दिसते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.