रहिवासाचा दाखला नाही, तर पास नाही; रेल्वेची सक्ती

आता नव्यानं रेल्वेचा पास काढणार असाल किंवा जुनाच पास रिन्यू करून घेणार असाल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा रहिवासी दाखला दाखवावा लागणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 29, 2014, 10:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता नव्यानं रेल्वेचा पास काढणार असाल किंवा जुनाच पास रिन्यू करून घेणार असाल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा रहिवासी दाखला दाखवावा लागणार आहे.
होय, अलाहाबाद हायकोर्टानं दिलेल्या आदेशावरून मध्य रेल्वेनं हा नवा नियम लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचा मासिक पास काढणाऱ्या पास धारकांना मासिक पास काढण्यासाठी रहिवासाचा पुरावाच सादर करावा लागणार आहे. खरं तर १ एप्रिलपासूनच हा नियम लागू करण्यात आलाय. परंतु, याबद्दल रेल्वेनं जाहीर माहिती देणं टाळलं.... आणि रेल्वेच्या पास काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना जेव्हा खिडक्यांवर त्यांच्या राहण्याचा पत्त्याचा पुरावा विचारला जाऊ लागला, तेव्हा प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.
तासनतास रांगेत उभं राहिल्यानंतरही वेळेवर रेल्वे पास मिळत नाहीत... त्यातच मासिक पास काढण्यासाठी रेल्वे प्रशासनानं केलेली रहिवासी दाखल्याच्या सक्तीमुळे रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.