स्कूल बसचा मंगळवारी संप

स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मंगळवारी एकदिवसासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सायन मध्ये स्कूल बस चालकाच्या चुकीमुळं एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यु झाला होता.

Updated: Dec 18, 2011, 11:07 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मंगळवारी एकदिवसासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सायन मध्ये स्कूल बस चालकाच्या चुकीमुळं एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यु झाला होता. त्यानंतर जुलै २०११च्या जीआर प्रमाणे आरटीओनं कारवाई सुरु केली आहे. त्यावर आक्षेप घेत हा संप पुकारण्यात आला आहे.

 

बसची १५ वर्षांची मर्यादा, बसचालकाचा अनुभव, खिडक्याचे बार अशा अनेक मुद्द्यावर असोसिएशननं आक्षेप घेतला आहे. ३ जानेवारीपर्यंत शाळेला ख्रिस्मसची सुट्टी आहे. मात्र तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

 

या संपामुळे सामान्य पालक हे मात्र वेठीला धरले जाणार आहेत, त्यामुळे मंगळवारी आपल्या मुलांना शाळेत पाठवताना पालकांना या स्कूल बस बंदच्या संपाचा चांगलाच फटका बसणार आहे असे दिसते. त्यामुळे मुंबईतल्या पालकांना मंगळवारी आपल्या मुलांना शाळेत पोहचवण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. आणि त्यासोबतच त्यांनी दमछाक होणार ती वेगळीच..