सी-लिंक होणार महाग...

वांद्रे-वरळी सी लिंकवरून नव्या वर्षात प्रवास महागण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून सध्याच्या ५० रुपयांऐवजी ७० रुपये टोल प्रस्तावित करण्यात आला आहे.

Updated: Dec 19, 2011, 06:33 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

वांद्रे-वरळी सी लिंकवरून नव्या वर्षात प्रवास महागण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून सध्याच्या ५० रुपयांऐवजी ७० रुपये टोल प्रस्तावित करण्यात आला आहे. गेली दोन वर्ष टोलमध्ये वाढ केलेली नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीला दरवर्षी टोल वसुलीत १५ कोटी रुपये तोटा होतो आहे.

 

त्यामुळं टोलमध्ये वाढ करावी अशी विनंती एमएसआरडीसीनं राज्य सरकारला केली आहे. सी लिंक वाहतुकीसाठी २००९ मध्ये खुला झाला. त्याच वेळी राज्य सरकारनं ७० रुपये टोल आकारण्याची परवानगी दिली होती. मात्र या मार्गावरून अधिक वाहनधारक जावेत यासाठी एमएसआरडीसीनं ५० रुपये टोल ठेवला. टोलवसुलीचं काम खासगी कंपनीला देण्यात आले. ही कंपनी एमएसआरडीसीला पैसे भरते

 

पण आता या सी लिंकवरून जाण्यासाठी तुम्हांला अधिक टोल भरावा लागू शकतो. त्यामुळे टोलच्या वाढीसाठी एमएसआरडीसीने टोल वसूलीत वाढ व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांचा मागणीचा विचार झाल्यास मुंबईकर वाहनधारकांना आपला खिसा थोडा जास्त रिकामा करावं लागणार आहे.