www.24taas.com, मुंबई
येडियुरप्पांसारखे अनेक मानवी बॉम्ब भाजपत असल्यानं गडकरी यांच्या रस्त्यात सुरूंग पेरल्याचा धोका आहे. अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येडियुरप्पांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नरेंद्र मोदींचं वर्चस्व दिसून आलं.
मोदींना हिरवा कंदिल दाखवल्यामुळेच गडकरींच्या फेरनिवडीचा मार्ग मोकळा झाला असंही बाळासाहेबांनी म्हंटल आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत अनेक सवाल उपस्थित केले. काँग्रेसच्या विरोधात सेनापतीशिवाय जनता रस्त्यावर उतरली. पण या संतापाचा आणि असंतोषाचा लाभ घेण्याच्या तयारीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे काय. असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना केला.
या आघाडीसोबत शिवसेना, अकाली दल, जनता दल आहे. मात्र केंद्रीतील काँग्रेसचे तख्त उलथवण्यासाठी ही रसद तुटपुंजी असल्याची टीका करून जुन्या भिडूंना पुन्हा सोबत घेण्याचा सल्लाही बाळासाहेबांनी दिला. दिल्लीचं तख्त काबीज करणं एव्हढं सोप्पं नसल्याचंही बाळासाहेबांनी सामानात म्हंटल आहे.