रिक्षा भाडेवाढ करा, अन्यथा संप- शरद राव

रिक्षाचे भाडे अकरा रूपयांवरून १६ रूपये करण्याची मागणी शरद राव यांनी केलीय. मागणी मान्य न झाल्यास राज्य भरातील रिक्षा संपावर जातील, असा इशारा त्यांनी दिलाय. सरकारनं भाडेवाढ करण्याची मागणी मान्य केली नाही तर ३० मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही शरद राव यांनी दिलाय.

Updated: Feb 24, 2012, 07:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

रिक्षाचे भाडे अकरा रूपयांवरून १६ रूपये करण्याची मागणी शरद राव यांनी केलीय. मागणी मान्य न झाल्यास राज्य भरातील रिक्षा संपावर जातील, असा इशारा त्यांनी दिलाय. सरकारनं भाडेवाढ करण्याची मागणी मान्य केली नाही तर ३० मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही शरद राव यांनी दिलाय.

परिणामी आधीच महागाईमुळे मेटाकुटीस आलेल्या सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा बंद आणि भाडेवाढीस सामोरं जावं लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या आधी दहा ऑक्टोबरला रिक्षा भाडेवाढ करण्यात आली होती. आता रिक्षा चालकांना महागाई भत्ता निर्देशांकाप्रमाणे भाडं मिळावं अशी मागणी करण्यात आलीय.

यापूर्वी ४ ऑक्टोबर  २०११ रोजी राज्य सरकारने रिक्षा चालकांच्या मनमानीपुढे मान तुकवत किमान भाडे कायम ठेऊन पुढील टप्प्यासाठी प्रत्येकी ५० पैसे वाढविले होते. ही भाडेवाढ १० ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली होती.

 मुंबईत कशी झाली होती रिक्षा भाडेवाढ

- किमान भाडे ११ रूपये, किमान भाड्यात कोणतीही वाढ नाही
- प्रतिकिलोमीटरसाठी आता ७ रूपये प्रवाशांना मोजावे लागतात.
- प्रवाशांना यापूर्वी प्रतिकिलोमीटर ६ रूपये ५० पैसे आकारले जात होते.
- मुंबईत ही रिक्षा भाडेवाढ येत्या १० ऑक्टोबरपासून लागू झाली.

ठाण्यात कशी झाली होती रिक्षा भाडेवाढ

-  ठाण्यात किमान रिक्षा भाड्यात १ रूपयाने वाढ झाली होती

-  ठाण्यात रिक्षाचं किमान भाडे आता १४ रूपयांवरून १५ रूपये झाले.
-  ठाणेकरांना आता प्रतिकिलोमीटर ९ रूपयांऐवजी ९ रूपये ५० पैसै मोजावे लागत आहेत.
-  ठाण्यात गेल्या ५ ऑक्टोबरलाच ही दरवाढ लागू झाली.

Tags: