राहुल गांधी यांना मुळात समज कमी असून त्यांना सल्ला कोण देतं हे मला माहिती नाही. या गांधी घराण्याने उत्तरप्रदेश आणि देशाची सत्ता उपभोगली, त्यांच्यामुळेच उत्तर प्रदेशातील लोकांना भीक मागायची वेळ आली, असल्याचा दणदणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार या उत्तरप्रदेशातील सभेच्या वेळी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. हे निवडणुकीचे स्टंट आहे, राहुल गांधी यांना मुळात समज कमी आहे. भीक या शब्दाचा फटाका काँग्रेसला किती बसणार आहे, हे आगामी निवडणुकीत दिसेल. अशा प्रकारच्या वक्तव्यांना मी भीक घालत नाही आणि यापुढेही भीक घालणार नाही, असा कुस्सीत टोलाही लगावला.
महाराष्ट्र काय आहे. महाराष्ट्रासाठी कोणी बलिदान दिले, या संदर्भात राहुल गांधी यांना फुकटात ट्युशन देऊ शकतो. मी बोललो तर राजकीय तेढ आणि दोन समाजात फूट पडते. आता यांच्या वक्तव्याचं काय आता नाही पडणार फूट? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.