www.24taas.com,मुंबई
मुंबई महापालिकेने १९ सप्टेंबर २०११च्या संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांना बोनस न देण्याचा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती.
म्युनिसिपल मजदूर युनियनच्या याचिकेवर औद्योगिक न्यायालयाने पालिका कर्मचा-यांना बोनस-सानुग्रह अनुदान १२ टक्के व्याजासहीत ३०दिवासाच्या आत देण्याचा निर्णय दिला आहे. पालिका कर्मचा-यांना २०११च्या दिवाळीआधी बोनस नाकारला होता. त्या विरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने उच्च नायालयात याचिका दाखल केली होती.
यावर उच्च नायालयानं बोनस न मिळालेल्या कर्मचा-यांना ७५०० बोनसपोटी देण्याचा आदेश दिला होता. मात्र ७५०० रूपये पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी संपकरी कर्मचा-यांच्या पगारातनं कापण्याचे आदेश दिले होते. यानंतर म्युनिसिपल मजदूर युनियननं पुन्हा बोनस - सानुग्रह अनुदानसाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती.