...तर मी ठेचून काढीन- राज ठाकरे

सीमा प्रश्नावर किती काळ आपण बेळगाव आणि कारवार येथील जनतेला फसवणार आहोत, त्यांना किती काळ आश्वासनं देणार आहोत. या प्रश्नावरून उगीच येथे राजकारण करायचे आणि त्यामुळे तेथील मराठी जनतेचे डोकी फुटणार हे किती काळ चालणार, असा सवाल राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

Updated: Jan 9, 2012, 09:53 PM IST

www.24taas.com,विलेपार्ले

सीमा प्रश्नावर किती काळ आपण बेळगाव आणि कारवार येथील जनतेला फसवणार आहोत, त्यांना किती काळ आश्वासनं देणार आहोत. या प्रश्नावरून उगीच येथे राजकारण करायचे आणि त्यामुळे तेथील मराठी जनतेचे डोकी फुटणार हे किती काळ चालणार, असा सवाल राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

 

विलेपार्ले येथे मॅजेस्टिक गप्पांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फटकेबाजी केली.  कर्नाटकमध्ये राहून कर्नाटक दिन हा काळा दिवस मानला, महाराष्ट्रात जर असं कोणी केलं तर मी ठेचून काढीन असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

 

यावेळी सुरूवातीला राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्र कलेविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.  यावेळी ते म्हणाले, मी जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना सुमारे १० तास स्केचिंग करीत होतो. जे दिसेल ते त्याचं स्केचिंग काढत होतो. बाळासाहेबांनी सुरूवातीपासून सांगितले होते. व्यंग्यचित्र सुचले आणि चित्र काढता येणार नाही, अशी परिस्थिती तुझ्यासमोर येऊ देऊ नको. रियाजाशिवाय व्यंग्यचित्रातही काही शक्य नाही.

 

व्यंगावरती व्यंग्यचित्र काढायचे नाही, हे मला पहिल्यापासून शिकवंल होतं. कोणत्याही चेहऱ्यात पाहताना त्याचे कान मोठे केले, नाक मोठं केलं म्हणजे व्यंग्यचित्र येत नाही. स्वरराज म्हणून व्यंग्यचित्रकार म्हणून कारर्किदीला सुरूवात केली पण माझ्यातील स्वर मी नाही काढला. तो बाळासाहेबांनी काढला. बाळासाहेब म्हटले, की मी माझे व्यंग्यचित्रची कारकिर्द बाळ ठाकरे म्हणून केली. तू आजपासून राज ठाकरे म्हणून काम करणार त्या दिवसापासून मी राज ठाकरे झालो. आज पण माझ्या पासपोर्टवर माझे नाव स्वरराजचं आहे.

 

[jwplayer mediaid="26275"]