डान्सबार, लॉजवर छापा, १०० जणांना अटक

मुंबईतल्या दहिसर भागात ४ बार आणि एका लॉजवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी १०० हून जास्त बारबालांना अटक केली आहे. दहिसर टोलनाक्याच्या परिसरात अनेक ठिकाणी डांन्सबार सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती.

Updated: May 27, 2012, 01:02 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या दहिसर भागात ४ बार आणि एका लॉजवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी १०० हून जास्त बारबालांना अटक केली आहे. दहिसर टोलनाक्याच्या परिसरात अनेक ठिकाणी डांन्सबार सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती.

या माहितीवरुन पोलिसांनी ४ बार आणि एका लॉजवर छापा टाकला. स्पीन्झ, मंत्रा, नाईट सिटी आणि समुद्रा अशी छापा टाकलेल्या बारची नावं आहेत. गेल्या काही दिवसांतली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे.

आर. आर. पाटील यांनी डांन्सबार बंद करण्याचा निर्णय घेतला, मात्र अजूनही काही डान्सबार छुप्यारितीने सुरू आहेत. मुंबईत बऱ्याच ठिकाणी असे डान्सबार हे आजही सुरू आहेत. त्यामुळे १०० टक्के डांन्सबार बंद करण्यात मुंबई पोलिसांना यश आलेले नाही.