जिग्ना वोरावर नार्को टेस्टची मागणी न्यायालायने फेटाळली

वरिष्ठ क्राईम रिपोर्टर जिग्ना वोराच्या न्यायालयीन कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली असून तिच्यवर नार्को टेस्ट करण्याची पोलिसांची मागणी मकोका न्यायालयाने फेटाळून लावली.

Updated: Dec 1, 2011, 12:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

वरिष्ठ क्राईम रिपोर्टर जिग्ना वोराच्या न्यायालयीन कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली असून तिच्यवर नार्को टेस्ट करण्याची पोलिसांची मागणी मकोका न्यायालयाने फेटाळून लावली. जिग्ना वोराला मिड-डेचे वरिष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.जिग्ना वोराला मागच्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. एशियन एजमध्ये क्राईम रिपोर्टर असणाऱअया जिग्ना वोराचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जातं.

जिग्ना वोरानेच राजन गँगला डे बद्दलची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. डे हत्ये प्रकरणी आता पर्यंत वोरासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. वोरावर कलम
३०२ अन्वये खुनाचा तसंच मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.