www.24taas.com, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्टूनचा वाद चांगलाच चिघळलाय. रामदास आठवले यांनीही या वादात उडी घेतलीय. बाबासाहेबांचे कार्टून हे अपमानकारक असल्याचं सांगत, तेव्हाच हे कार्टून नष्ट करायला हवे होते, असं त्यांनी म्हटलंय. तसंच पाठ्यपुस्तकात हे कार्टून छापणे त्याहूनही चुकीचे असल्याचं सांगून, पुस्तकात हे कार्टून छापणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केलीय.
दरम्यान, वादग्रस्त कार्टूनबाबत खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्याची री ओढत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी हा वाद विनाकारण निर्माण झाल्याचं म्हटलंय.
त्यांनी सुहास पळशीकरांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध केलाय. शिवाय पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. शिवाय या सगळ्या वादाचं खापर त्यांनी माध्यमांवर फोडलंय.