काय आहे शेअरबाजाराची स्थिती..

मुंबई शेअरबाजार 17 हजार 516 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 326 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्समध्ये 81 अंशाची घट होताना दिसली. तर निफ्टीमध्येही 32 अंशाची घट होताना दिसली.

Updated: Apr 4, 2012, 11:28 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई शेअरबाजार 17 हजार 516  सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार  5 हजार 326  निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्समध्ये 81  अंशाची घट होताना दिसली. तर निफ्टीमध्येही 32 अंशाची घट होताना दिसली.

डॉलरच्या तुलनेत रूपया आज 50 पूर्णांक 92 वर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या किंमतीत शून्य पूर्णांक 15 अंशांची घट दिसून येते आहे.  तर काल शेअरबाजाराचा सेन्सेक्स 17 हजार 597 अंशांवर बंद झाला होता. त्यात 119 अंशांची वाढ दिसून आली होती. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी काल 5 हजार 358 अंशावर बंद झाला.

त्यात 40 अंशाची वाढ झाली. मागच्या तुलनेत काल सकाळी बाजार वरच्या पातळीवर खुला झाला होता, त्यानंतरच्या तासाभरात किंचीत घट पहायला मिळाली, युरोपीयन बाजार वरच्या पातळीवर खुले झाल्यामुळे, दुपारच्या सत्रात बाजार हळूहळू वर चढत गेला आणि ब-याच वेळ वरच्या पातळीवरच स्थिर होता पण त्यानंतर काहीशी घट होत बाजार 17 हजार 597 अंशांवर स्थिरावला होता.