काँग्रेसच्या तिकीटवाटपावर प्रिया दत्त नाराज

तिकीटवाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. मुंबईतल्या तिकीटवाटपावरुन उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त या नाराज झाल्या आहेत. उत्तर मुंबईत झालेल्या तिकीट वाटपात मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मनमानीविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Feb 2, 2012, 12:00 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

तिकीटवाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. मुंबईतल्या तिकीटवाटपावरुन उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त या नाराज झाल्या आहेत. उत्तर मुंबईत झालेल्या तिकीट वाटपात मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मनमानीविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडेही तक्रार करणार आहेत.

 

काँग्रेस आमदार मधु चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी मिळाल्यानं, मुंबई काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष रोहिदास लोखंडे नाराज झाले आहेत. पक्ष नेतृत्वाला डोळेच नसल्याची टीका त्यांनी केली आहे. आमदार खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देणार नाही, या माणिकराव मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

कार्यक्रमासाठी गाड्या भरुन जनता आणण्यासाठी केवळ आमची आठवण होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईचे काँग्रेसचे निलंबित सरचिटणीस अजित सावंत यांच्यापाठोपोठ मुंबई काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षांनीही नेतृत्वावर टीका केल्यानं काँग्रेसमधील नाराजी उघड झाली आहे.