नीरज ग्रोवर खुन खटल्यातील दोषी नौदल अधिकारी एमिल जेरोमचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात पुरेसा परिस्थितीजन्य पुरावा असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं. एमिल जेरोमने दाखल केलेल्या याचिकेची तसंच राज्य सरकारने सजेत वाढ व्हावी यासाठी केलेल्या अपीलाची जलद सूनावणी होणं एवढचं आम्ही करु शकतो असं निरीक्षण खंडपीठाचे न्यायाधीश व्ही.एम.कानडे आणि एम.एल.तहलयानी यांनी नोंदवली आहे.
एमिल जेरोमची जामीन फेटाळताना न्यायालयाने याचिकांच्या जलद सूनावणीची तारिख फेब्रुवारीत ठेवली आहे. सत्र न्यायालयाने सुरवातीपासूनच सहआरोपी असलेल्या मारिया सूसाईराजने जबानी फिरवल्यावर विश्वास ठेवण्याची चूक केल्याचा शेरा मागच्या सूनावणीच्या वेळेस न्यायालयाने मारला होता. सत्र न्यायालयाने जेरोम आणि त्याची प्रेयसी सूसाईराज या दोघांनाही खूनाच्या आरोपातून मुक्त केलं होतं आणि ही पूर्वनियोजीत हत्या नसल्याचं कारण दिलं होतं. जेरोमला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी दहा वर्षे कारावासाची सजा सूनावली आणि सूसाईराजला पुरावे नष्य केल्याच्या आरोपाखाली तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. पण सूसाईराजने आरोपी म्हणून तितका काळा तुरुंगात काढल्याने निकालाच्या दुसऱ्या दिवशी तिची सुटका करण्यता आली. उच्च न्यायालयाने एमिल जेरोम आणि सूसाईराज यांची तसेच राज्य सरकारची याचिका दाखल करुन घेतल्या आहेत.