एअर इंडियांच्या संपाचा फटका 'राजा'ला

महाराजाच्या संपाचा फटका एका राजाला बसला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण एअर इंडियाच्या पायलटसच्या संपाचा फटका अनेक फळांच्या आणि भाज्यांच्या निर्यातीला बसला.

Updated: May 22, 2012, 10:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराजाच्या संपाचा फटका एका राजाला बसला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण एअर इंडियाच्या पायलटसच्या संपाचा फटका अनेक फळांच्या आणि भाज्यांच्या निर्यातीला बसला. त्यातच फळांचा राजा हापूसही भरडला जातो. निर्यातच बंद झाल्यानं, देशात स्वस्तात हापूस विकण्याची वेळ उत्पादकांवर येऊन ठेपली. फळांचा परदेशात व्यापार करणारे हे आहेत मोहन डोंगरे. गेल्या वर्षभरापासून ते हापूस आंबा बाजारात येण्याची वाट पाहतायेत..माक्ष यंदा चांगंलं उत्पादन होनही, मोहन डोंगरे निराश आहेत.

 

हापूसचा बाजारपेठेत असलेला मुख्य काळ, त्यात रुपयाची घसरण आणि एअर इंडियाच्या पायल्टसचा संप असा तिहेरी फटका हापूसच्या निर्यातीला बसलाय.. यामुळं परदेशात हापूसची वाट पाहत असणा-या ग्राहकांसाठी, जास्तीचा कार्गो दर आकारुन त्यांना हापूस परदेशात पाठवावा लागतोय.. जास्तीचा कार्गो दर आकारुन परदेशात आंबा पाठवणे, किंवा घरगुती बाजारात स्वस्त दरात हापूस विकणे, असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर खुले आहेत.. मुंबईच्या बाजारात दररोज ८० हजार आंब्याच्या पेट्या येतात, त्यापैकी ३० ते ३५ हजार पेट्या परदेशात नेहमी निर्यात होत असतात. अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आखाती देशांमध्ये हापूस आंब्याला मोठी मागणी आहे.

 

एअर इंडियाच्या संपामुळं या देशांमध्ये हापूस पाठवणं, अवघड होऊन बसलय. एअर इंडियाच्या संपानंतर दुस-या विमानसेवांनी कार्गोचे दर दुपटीने वाढवलेयेत. त्यामुळे युरोपात एक किलो हापूस पाठवण्यासाठी लागणारा कार्गो दर ६०-७० रुपयांवरुन १०४ रुपयांवर जाऊन पोहचलेत. तसचं अमेरिका कॅनडासाठी कार्गो दर ७०-७५ रुपयांवरुन १०२-१०४ रुपयांच्या घरात पोहचलेत. तर आखाती देशात आता एक किलो हापूस पाठवण्यासाठी ७५ ते ८० रुपये खर्च आहे, जो या संपापूर्वी ३५ ते ४० रुपये होता.

 

हापूसप्रमाणेच चिक्कू आणि द्राक्षांच्या निर्यातीलाही हा फटका बसलाय. तर निर्यात होणा-या अनेक भाज्यांनाही या नव्या कार्गो दरांचा फटका बसतोय.. महाराजाच्या या संपामुळे फळांच्या राजाला हा असा फटका सहन करावा लागतोय. यामुळे हापूस आंबा उत्पादक आणि व्यापा-यांच्या संकटात भरच पडलीय.