अण्णांच्या आंदोलनासाठी जय्यत तयारी

अण्णांच्या आंदोलनासाठी MMRDA मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. आंदोलनात उपस्थित राहणा-या आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

Updated: Dec 26, 2011, 08:46 PM IST

झी 24 तास वेब टीमसाठी श्वेता जोशी मुंबई

 

अण्णांच्या आंदोलनासाठी MMRDA मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. आंदोलनात उपस्थित राहणा-या आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात  आल्या आहेत.

 

अण्णांच्या आंदोलनासाठी रणभूमी सज्ज झालीए.. MMRDA मैदानावर सुमारे साठ हजार आंदोलकांची सोय करण्यात आली आहे.  मैदानाच्या पूर्वेकडे बारा फुटांचं भव्य स्टेज उभारलं गेलं आहे. अण्णा आणि त्यांच्या सहका-यांसाठी दहा बाय वीस चौरस फुट खोलीची सोय करण्यात आलीए. आंदोलकांसाठी मैदानाच्या पश्चिमेला 32 फिरत्या शौचालयांची सोय असणार आहे.   आंदोलनादरम्यान 12 डॉक्टर, सहा अँम्ब्युलन्स आणि एक अग्निशमन पथक चोवीस तास मैदानात तैनात राहणार आहे.

 

त्याचप्रमाणं मैदानावर आंदोलना दरम्यान वीजेची समस्या निर्माण झाल्यास तीन जनरेटर्सही उपलब्ध करण्यात आलेत. तसंच हरयाणातल्या स्वयंसेवकांकडून उपोषण न करणा-या आंदोलकांसाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाची सोयही करण्यात आली आहे. दिनांक  27 ते 29 डिसेंबरदरम्यान अण्णांचं MMRDA मैदानावर आंदोलन होतंय. अण्णांच्या आंदोलनाला उपस्थित राहणा-या आंदोलनकर्त्यांची संख्या पाहता योग्य त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयत्या वेळी व्यवस्थेचा बोजवारा उडणार नाही, अशी अपेक्षा आहे.

 

 

 

Tags: