कळवा येथे तांत्रिक बिघाडाने मुंबईची 'लाईफलाईन' ठप्प

 कळवा स्थानकाजवळ काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Updated: Apr 23, 2015, 03:12 PM IST
कळवा येथे तांत्रिक बिघाडाने मुंबईची 'लाईफलाईन' ठप्प  title=

ठाणे:  कळवा स्थानकाजवळ काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळी कामावर निघालेले मुंबईकर रेल्वे स्थानकावर आले, मात्र कळवा येथे झालेल्या तांत्रिक बिघाडाचा नाहक त्रास त्यांना करावा लागला. सकाळी 9.20च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणारी स्लो लाईनची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थांनाही या बिघाडाचा त्रास सहन करावा लागला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.