या बंडखोराचं करायचं काय?

भाजप सरचिटणीस पराग अळवणीची पत्नी ज्योती, शिवसेना उपनेते राजा चौगुले यांच्या बंडखोरी चर्चा सुरू असताना मातोश्रीच्या वॉर्ड क्रमांक ८९ मधून शिवसेनेचे शाखाप्रमुख सुहास पाटील. आणि मातोश्रीवर काम करणाऱ्यां निलेश नार्वेकरनीच बंड केल आहे.

Updated: Feb 6, 2012, 11:10 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीला त्यांच्याच बंडखोराच तगडं आव्हान आहे. भाजप सरचिटणीस पराग अळवणीची पत्नी ज्योती, शिवसेना उपनेते राजा चौगुले यांच्या बंडखोरी चर्चा सुरू असताना मातोश्रीच्या वॉर्ड क्रमांक ८९ मधून शिवसेनेचे शाखाप्रमुख सुहास पाटील. आणि मातोश्रीवर काम करणाऱ्यां निलेश नार्वेकरनीच बंड केल आहे.

 

शिवसेनेचे उपनेते राजा चौगुले यांनी वॉर्ड क्रमांक १२२ भटवाडी घाटकोपर मधून बंडखोरी केली आहे. तर भाजप सरचिटणीस पराग अळवणीची पत्नी ज्योतीनं वॉर्ड क्रमाक ८० विलेपार्ले पूर्वमधून बंडखोरी केली आहे

 

बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं पक्षनेतृत्वानं आता भावनिक आवाहन करायला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांना या वयात दु:ख देणार का असा सवाल करत अजुनही अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्या असं आवाहन केलं जात आहे. शिवसेनेनं बंडखोराना थंड करण्यासाठी प्रयत्न करुनही अनेक बंडखोर पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरले आहेत.