मुंबई : राज्यातील खुल्या प्रवर्गसाठी आरक्षित असलेल्या १६ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
१० जून २०१६ ला या जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत खरं तर पडली होती मात्र लातूर आणि सोलापूर हे जिल्हे लागोपाठ महिलांसाठी आरक्षित झाल्याने महिला आरक्षणासाठी बदल करण्यासाठी १६ जिल्हा परिषदांसाठी नव्य़ाने सोडत काढण्याचे आदेश उच्च न्यायालाने दिले होते. त्यानुसार आज झालेल्या सोडत झाली.
दरम्यान १० जूनला झालेल्या सोडतीत पुरुषांसाठी राखीव असलेले जि प अध्यक्षपद आता महिलांसाठी राखीव झाले आहे त्यामुळे अनेकांचे राजकीय मनसुबे उधळले गेले आहेत.
खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदांमध्ये पुढील जिल्हे –
कोल्हापूर, सांगली , सोलापूर, लातूर, अहमदनगर, जालना, चंद्रपूर, सातारा
तर महिलांसाठी जि प अध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या जिल्ह्यामंध्ये
वाशिम , बीड , गडचिरोली , रत्नागिरी, नांदेड, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक यांचा समावेश आहे.
१० जूनला झालेल्या सोडतीत पुरुषांसाठी राखीव असलेले जि प अध्यक्षपद आता महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनेकांचे राजकीय मनसुबे उधळले गेले आहेत. मागली ६ महिन्यांपासून अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांनी तयारी सुरु केली होती मात्र आता तयारीवर पाणी फिरले आहे.