बडनेरा : शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे. अमरावती-बडनेरा मार्गावरील रल्वे उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या श्रेयावरून आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
अर्धवट बांधकाम असलेल्या पुलाचे अनधिकृत रित्या उद्घाटन आमदार रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी केलं होतं. त्याच दिवशी खासदार अडसुळांनी या पुलावर भेट देऊन अनधिकृतपणे हा पूल वाहतुकीस खुला केला होता. त्यानंतर आमदार राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारांना बद्दल अपशब्द चा वापर केला होता. या सगळ्याचा निषेध म्हणून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांचे बडनेरा येथील कार्यालयाल फोडले.