व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

ठाण्याच्या कळवा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका चालत्या रेल्वेमधून एका तरुणाला खाली फेकण्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. 

Updated: May 15, 2016, 11:22 AM IST
व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार title=

ठाणे : ठाण्याच्या कळवा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका चालत्या रेल्वेमधून एका तरुणाला खाली फेकण्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. 

या व्हिडिओमध्ये एका तरुणाला एक व्यक्ती रेल्वेमधून खाली ढकलताना दिसतेय. ट्रेनमधून धक्का दिल्यानं प्लॅटफॉर्मवर कोसळलेल्या तरुणाचा रेल्वेखाली येऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीनंही चालत्या ट्रेनमधून उडी मारत घटनास्थळावरून पळ काढला.