मराठवाड्यात एकाच दिवशी ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळं वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्यानं मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. लातूर जिल्ह्यातील तीन आणि बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेनं मराठवाडा हादरून गेला.

Updated: Dec 3, 2014, 10:56 AM IST
मराठवाड्यात एकाच दिवशी ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो

औरंगाबाद : तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळं वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्यानं मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. लातूर जिल्ह्यातील तीन आणि बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेनं मराठवाडा हादरून गेला.

बाळू माधवराव ममाले

आत्महत्येचं कारण: कर्ज काढून दोन बोअर घेतलं, पाणी लागलं नाही़ पुन्हा कर्ज काढून दोन बोअर घेतलं, पण तेही बंद पडलं.

गोविंद तुळशीराम कावळे

आत्महत्येचं कारण: व्याजाचा डोंगर निसर्गानं यंदाही अवकृपा केल्यानं घरातील खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता़... त्याच्या पश्चात : पत्नी, दोन मुली

भैरवनाथ वसंत देशमुख

आत्महत्येचं कारण: आईच्या नावावर ४ लाखांचं कर्ज. या विवंचनेतून उचललं पाऊल.
त्यांच्या पश्चात: आई, पत्नी, बहीण, मुलगी असा परिवार आहे.

बाबासाहेब महादेव भोसले

आत्महत्येचं कारण: नापिकी, कर्जाचं ओझं त्यामुळं काही दिवसांपासून निराश होता.
त्याच्या पश्चात: आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी.

भगवान ग्यानदेव निपटे

आत्महत्येचं कारण : बँक आणि खाजगी सावकाराचं कर्ज. हप्ता देणं कठीण झालं. पाऊस कमी झाल्यानं उत्पादनातही घट झाली.
त्यांच्या पश्चात: पत्नी, दोन मुलं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x