त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशासाठी महिला संघटना आक्रमक

शनिशिंगणापूरनंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश मिळावा यासाठी महिला संघटना आक्रमक होणार आहेत.  

Updated: Jan 29, 2016, 11:22 PM IST
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशासाठी महिला संघटना आक्रमक title=

नाशिक : शनिशिंगणापूरनंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश मिळावा यासाठी महिला संघटना आक्रमक होणार आहेत. लेखी स्तरावर तक्रार होऊनही प्रवेश मिळत नसल्याने आंदोलनाच्या चर्चेने त्र्यंबकेश्वर नगरी सतर्क झालीय.

 

या प्रवेशाच्या मागणीवरून महिलांमध्येही दोन तट पडलेत. त्र्यंबकेश्वर. एक आद्य ज्योतिर्लिंग. देशापरदेशातून अनेल शिवभक्त इथे दर्शनासाठी य़ेतात. याच ठिकाणी नारायण नागबळीची पूजा केली जाते. या पुजेसाठी भाऊ बहिणीच्या कुटुंबासह एकत्रित कुटुंब याठिकाणी दोन ते तीन दिवस राहतात. या पूजेनंतर कुटुंबातील कर्ते पुरूष त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात दर्शनासाठी जातात. मात्र महिलांना प्रवेश मिळत नाही. इंदोरहून आलेली एक महिला या प्रवेशाबाबत मागणी करत आहेत. तर विश्वस्त महिला मात्र सावध प्रतिक्रिया देत आहेत.

 

मंदिराच्या गर्भगृहातल्या प्रवेशावरून सध्या गावात प्रत्येक घरात चर्चा रंगलीय. शनिशिंगणापूर प्रमाणे इथेही गोंधळ होऊ शकतो म्हणून पोलीस सतर्क झालेत. गावात समानतेबाबत फलक लिहून जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातोय. मात्र इथेही गावातल्या स्थानिक महिला गर्भगृह प्रवेशाच्या मागणीच्या विरोधात आहेत.

रणरागिणी आता त्र्यंबकेश्वरचा मुद्दा अजेंड्यावर घेणार असल्याने पुरोहीत संघ आणि विश्वस्तांमध्ये बैठकीत हा मुद्द्या प्रामुख्याने घेण्याची गरज आहे. महिला प्रवेशाचा मुद्दा चर्चेतून सुटू शकतो. सर्व स्तरातून पारदर्शक चर्चा झाल्यास आगामी काळात शनि शिंगणापूरची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते.