पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरातल्या ज्ञानदीप शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका सीनिअर क्लार्कला महिला आणि मुलींनी जोरदार चोप दिलाय…
शिवानंद चौधरी असं या क्लर्कचं नाव असून त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिवानंद चौधरीकडे बँक खातं, बोनाफाईड सर्टिफिकेट अशी विविध कामं घेऊन विद्यार्थिनी गेल्यानंतर तो त्यांच्याशी अश्लील चाळे करत असे. त्याच्याकडे काल एक विद्यार्थिनी गेली असता त्यानं तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.
झालेला प्रकार त्या मुलीनं घरी सांगितल्यानंतर दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी आणि त्या विद्यार्थीनीनं शिवानंद चौधरीला चोरदार चोप दिला.
पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांत विविध शाळांमध्ये अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यायत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न शहरात उपस्थित झालाय.