प्रियकराच्या मदतीने महिलेने केली आपल्या मुलाची हत्या

एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या १५ वर्षाच्या मुलाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. 

Updated: Feb 9, 2016, 11:39 AM IST
प्रियकराच्या मदतीने महिलेने केली आपल्या मुलाची हत्या title=

पुणे : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या १५ वर्षाच्या मुलाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. इतकेच नव्हे तर या मातेने त्या मुलाचा मृतदेह घरातच पुरून क्रूरतेची पातळी गाठली. याप्रकरणातील आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही फरार आहेत. 

दिल्लीत राहणारी ४० वर्षीय वरिता लॉयल घटस्फोटित होती. तिला तीन मुलं आहेत. दोन मुले तिच्या बहिणीकडे राहतात. सप्टेंबरमध्ये तिसऱा मुलगा निकोलसला घेऊन ती पुण्याला पोहोचली. निकोलस आपल्यासोबत असल्याचे वरिताने आपल्या वडिलांना सांगितले. 

त्यानंतर २४ डिसेंबरला वरिताचा प्रियकर युनुसने निकोलसने आत्महत्या केल्याची बातमी वरिताच्या वडिलांना दिली. मात्र वरिताच्या वडिलांना हत्येचा संशय आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे त्यांनी तक्रार दाखल केली. या घटनेनंतर वरिता आणि युनुस दोघांनाही संपर्क होत नव्हता. 

युनुसच्या एका मित्राच्या मदतीने पुण्याचा घरात तपास करण्यात आला. यावेळी बेडखालच्या तीन फूट खोल खल्ल्यात त्याचा मृतदेह सापडला. वरिताचे युनुसशी अनैतिक संबंध होते. या संबंधात अडथळा ठरत असल्यामुळेच निकोलसची हत्या केल्याचे समजतेय.