'तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

Updated: Dec 26, 2016, 07:49 PM IST
'तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरणार नाही' title=

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. जोपर्यंत हाडाचा कार्यकर्ता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ज्यांना आम्ही मोठं केलं, महापौर, उपमहापौर केलं, ते आज सोडून चालले आहेत, असंही अजितदादा म्हणाले.

अजित पवार एकदाच घसरला होता, आता परत घसरणार नाही. एकदाच घसरलो होतो, आता कानाला खडा लावला असल्याची कबुली अजितदादांनी दिली आहे. हल्ली मी प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. पिंपरीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी अजित पवार बोलत होते.