पत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक

पुण्यात एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना उघडकीस आलीय. पत्नीला ठार करून तिचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या क्रूर पतीला पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Oct 9, 2015, 09:11 PM IST
पत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक title=
हे दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतं

पुणे : पुण्यात एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना उघडकीस आलीय. पत्नीला ठार करून तिचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या क्रूर पतीला पोलिसांनी अटक केलीय.

पुण्याच्या कात्रज भागात ही सुन्न करणारी घटना घडलीय. 53 वर्षीय रामू चव्हाण या क्रूर पतीला पोलिसांनी कुऱ्हाडीसह अटक केलीय.

एका महिलेचं छाटलेलं मुंडकं एका हातात आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन फिरणारा रामू चव्हाण रस्त्यावर फिरताना अनेकांच्या नजरेस पडला होता. पोलिसांनी सावधानता बाळगत त्याला तातडीनं अटक केली.

हाती लागलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामू चव्हाण याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच त्यानं आपल्या पत्नीची हत्या केली असावी, असं समजतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.