पवारांच्या 'काडी' मागचे राजकारण

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. पण या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 26, 2017, 09:08 PM IST
 पवारांच्या 'काडी' मागचे राजकारण  title=

प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. पण या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
युती तुटल्यानंतर पवार म्हणाले मला अतिव दुःख झाले आहे. इतक्या वर्षांची युती तुटली याचे दुःख होत आहे. 

शिवसेनेने जर राज्यात भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारला पाठिंबा देईल. 

यापूर्वीही केली होती पवारांनी काडी

राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास आला पण त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंब्याची गरज होती.  शिवसेना सत्ते सामील न होता विरोधात राहणे पसंत करत होती. त्यांनी एकनाथ शिंदेना विरोधी पक्षनेतेपदी घेतले होते. 

त्यानंतर राज्याच्या जनतेचा कौल स्वीकारत शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घोषीत केला होता. यातून पवारांची एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न होता.  शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा... पण भाजप सेनेने युती करून पवारांची ही काडी मो़डली होती. 

आता पुन्हा या काडीमोडानंतर पवारांनी काडी केली आहे. 

पवारांच्या या वक्तव्यामागील राजकारण

शरद पवार यांनी भाजपला पुन्हा पाठिंबा देऊ केला आहे. यामागे मोठे राजकारण आहे. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील एक नंबरचा शत्रू हा भाजप आहे. त्यांनी अशी खेळी करून भाजपची प्रतिमा मलीन करायची आहे. काल त्यांना पद्मश्री जाहीर करू मोदींनी बारा मत्तीचे बळी मिळविल्या आनंद घेतला. पण आताा पवारांनी भाजपला पाठिंब्याची ऑफर देऊन त्या मोदींच्या खेळीला सडेतोड उत्तर दिले आहे.

पवारांच्या दृष्टीकोनातून शिवसेनाला फायदा झाला तर भविष्यात होणारी भाजपची घौडदौड रोखली जाईल.  त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा राष्ट्रवादीला होणार आहे.