पिंपरी-चिंचवडच्या गडावर कोणाची सत्ता?

राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत. 

Updated: Feb 23, 2017, 09:45 AM IST
पिंपरी-चिंचवडच्या गडावर कोणाची सत्ता?  title=

पिंपरी-चिंचवड : राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत. 

पिंपरी-चिंचवडमधील १२७ जागांसाठी तब्बल ७७४ उमेदवार रिंगणात आहेत.सध्या पिंपरी-चिंचवडचा गड राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यासमोर गड राखण्याचे आव्हान आहे. 

यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कोणाला कौल दिलाय. राष्ट्रवादी त्यांचा गड कायम राखणार की अन्य कुणाला जनतेचा कौल मिळणार हे थोड्याच वेळात आपल्या समोर येईल.