धुळे : मुख्यमंत्र्यांचा आज धुळ्यात दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध विकासकामांचं करणार उद्घाटन ते करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौ-यानिमित्त नदीघाट आणि झाडे धुण्यासाठी शेकडो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे शहरात विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी येत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्या आधीच पोलीस प्रशासनाने एक दोन नव्हे तर तब्बल ३८ प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कलम १४९ अन्वये नोटीस बजावल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने भाजप वगळता सर्वात प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना नोटीस बजावल्याने पोलिसांच्या या मुस्कटदाबीची चर्चा सध्या धुळ्यात रंगली आहे. सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेच्या पधाधिकार्यांनाही यातून सोडण्यात आलेलं नाही. अशा नोटीसा बजावणे म्हणजे लोकशाहीचा खून असून अभिव्यक्ती स्वतंत्र भाजप शासन काळात संपुष्ट येत असल्याचा घणाघात विरोधकांनी केला आहे.