लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. औराद शहाजनी इथले  नागरिक आणि आर्ट ऑफ लिविंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचे हे फळ आहे. त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेडा आणि परिसरातील गावातील आटलेल्या बोअर्सचे पाणी ही वाढले आहे.

Updated: Jun 14, 2016, 03:27 PM IST
लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी title=

मुंबई : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. औराद शहाजनी इथले  नागरिक आणि आर्ट ऑफ लिविंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचे हे फळ आहे. त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेडा आणि परिसरातील गावातील आटलेल्या बोअर्सचे पाणी ही वाढले आहे.

गेल्या चार वर्षात लातूर जिल्ह्यानं पर्जन्यमानानं नवे नीचांक गाठले. परिणामी निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील औराद शहाजनीतून वाहणारी तेरणा नदी कोरडी ठाक पडली. पण यंदा औराद शहाजनीच्या ग्रामस्थानींनी दुष्काळात संधी शोधली. श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशनच्या प्रेरणेतून नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं. लोकसहभागातून झालेल्या याकामाचा फायदा पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात दिसायला लागलाय.

नदीपात्रातल्या पाण्यामुळे औराद शहाजनी आणि आजूबाजूच्या परिसरातील गावातील आटलेल्या बोअर वेल्सचं पाणी वाढलय. याशिवाय याचा लाभ शेतीलाही होणार असल्यामुळे ग्रामस्थ आनंदी आहेत. 

आपल्या महेनतीचं इतक्या लवकर फळ मिळेल, असं ग्रामस्थांना कधीच वाटलं नव्हंत. मान्सूनपूर्व पावसानं तयार झालेलं हे चित्र पुढे मान्सूनच्या काळातही असंच कायम राहवं अशी इच्छा आता गावकरी व्यक्त करताय.