दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा - आठवले

रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी यांनी पाथर्डी तालुक्याला भेट दिली.. ऐन दिवाळीत घडलेल्या दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी रामदास आठवलेंनी केलीय.. 

Updated: Oct 23, 2014, 01:37 PM IST
दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा - आठवले title=

पाथर्डी: रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी यांनी पाथर्डी तालुक्याला भेट दिली.. ऐन दिवाळीत घडलेल्या दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी रामदास आठवलेंनी केलीय.. 

याबाबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगीतलंय. तर या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी केलीये..

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एकाच दलित कुटुंबातील तिघांची हत्या करणयात आलीये. आई, वडिल आणि तरुण मुलगा यांची रात्री निर्घृण हत्या करून, त्यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले. 
जवखडे खालसा या गावातील जाधव वस्तीत ही घटना घडली. संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. 

हत्या कोणी आणि का केली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक होऊ शकली नाही. मात्र जातीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.