भाजपचे गिरीश बापट यांना मस्ती आलेय : शिवसेना आमदार शिवतारे

शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री आणि भाजपचे मंत्री गिरीश बापटांवर हल्लाबोल केला.मेट्रोच्या भूमिपूजनाला बोलावले नाही म्हणून जहरी टीका केली आहे. बापट यांना मस्ती आली आहे, असा प्रहार केलाय.

Updated: Dec 27, 2016, 02:59 PM IST
भाजपचे गिरीश बापट यांना मस्ती आलेय : शिवसेना आमदार शिवतारे title=

पुणे : शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे  यांनी पालकमंत्री आणि भाजपचे मंत्री गिरीश बापटांवर हल्लाबोल केला.मेट्रोच्या भूमिपूजनाला बोलावले नाही म्हणून जहरी टीका केली आहे. बापट यांना मस्ती आली आहे, असा प्रहार केलाय.

 प्रोटोकॉलनुसार आमदार शिवतारे यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, भाजपकडून त्यांना टाळण्यात आले. पुणे मेट्रोच्या भूमीपूजनाला गिरीश बापट यांनी बोलावलं नाही, मुद्दाम डावललं, असा आरोप त्यांनी केला. पुरंदर मतदार संघाचे ३१ प्रभाग मेट्रोच्या क्षेत्रात येतात तरी मेट्रोच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. संसदीय कामकाज मंत्री असलेल्या बापट यांच्यापेक्षा प्रोटोकॉल कोणाला माहीत आहे? बापट यांना मस्ती आली आहे, असे ते म्हणालेत.

नगर पालिका निवडणुकात बापट यांनी युती केली नाही. त्यांना पुण्यातही युती करायची नाही. पिंपरीत मात्र करायची आहे. बापट आणि कंपू  मुख्यमंत्री यांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कसा फायदा होईल, असे बापट वागत आहेत, असा हल्लाबोल खासदार शिवतारे यांनी केला.